बदलापूर अत्याचाराची घटना कशी उघड झाली? मुलगी म्हणाली आई मला ‘शु’च्या जागेवर….; घटनेने सगळेच हादरले

कोलकत्ता येथील नर्सवर अत्याचाराची घटना ताजी असताना आता बदलापूर येथील एका मोठ्या शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा देश हादरले आहे. याबाबत भयंकर माहिती समोर आली आहे.

यामुळे पालक संतप्त झाले असून त्यांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. याबाबत आंदोलन करून रेल्वे बंद करण्यात आले आहे. नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल्वे रुळावर उभे राहून घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या आंदोलनामुळे या मार्गावरची सेवा ठप्प झाली आहे.

या चिमुरडीने आपल्या आईकडे गुप्तांगात त्रास होत असल्याची तक्रार केली. जेव्हा डॉक्टरांनी या चिमुरडीला तपासले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. ही घटना समोर येताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेची अखेर दखल घेण्यात आली आहे.

घटना घडल्यानंतर मुलीने ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत, असं आईला सांगितले. आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादाने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या शाळेत अजूनही सीसीटीव्ही नाहीत, संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड उघडले नाही. यामुळे हा संताप पुढे येताच अनेकांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं. संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आता कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.