बारामतीतील घटनेने महाराष्ट्र हादरला! व्यायाम करताना महिलेला रस्त्यात अडवलं, अर्धनग्र केलं अन्…

सध्या एक धक्कादायक घटना बारामतीमधून समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बारामतीतील वंजारवाडी येथील चौकात संध्याकाळच्या वेळी चालत व्यायाम करणाऱ्या महिलेला अर्धनग्न करुन १ लाख ५ हजार रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर ही घटना घडली आहे. याप्रकणी महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास वंजारवाडी चौकातील उड्डाण पुलाजवळ चालण्याचा व्यायाम करत असताना लंघुशकेच्या निमित्ताने ती शेजारील उसाच्या शेतात गेली असता, एक अनोळखी इसम तिच्या मागा आला. यामुळे ती घाबरली.

त्याने चाकू काढत तिच्या गळ्याला लावला आणि गळ्यातील दागिने काढायला लावले. ती महिला दागिने काढत असताना आणखी दोघेजण तिथे आले त्यातील एकाने पीडिताचे तोंड दाबून धरत तिचा मोबाईल जबरदस्त हिसकावून घेतला. तसेच तिला विहिरीच्या कडेला असलेल्या उसाच्या पिकात नेण्यात आले.

तेथे चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील टॉप्स, सोन्याचे अंगठी असे एक लाख पाच हजारांचे दागिने काढून घेण्यात आले. नंतर चाकू हातात घेतलेल्या युवकाने तिला कपडे काढण्यात सांगितले. तिने नकार दिला, तेव्हा तिची ओढणी बाजूला फेकून देण्यात आली.

तिच्या अंगावरील टॉप फाडून काढला. तिच्या अंगातील पॅन्ट जबरदस्तीने काढून फेकून दिली. तसेच तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढत तिचा मोबाईल तिथेच फेकून दिला आणि ते फरार झाले. यामुळे ही महिला खूपच घाबरली होती. या घटनेने नंतर बारामती हादरली आहे.

दरम्यान, पोलीस याठिकाणी महिलेकडून माहिती घेतली आहे. दरम्यान, याठिकाणी पालखी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अशीच स्थिती आहे. याठिकाणी रात्री अनेकांच्या गाड्या अडवल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याठिकाणी गस्त घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.