IND vs AUS 3rd T20I: सूर्याच्या ‘या’ मूर्खपणामुळे ऋतुराजच्या शतकावर फेरले पाणी, मॅक्सवेलच्या वादळात भारताचा लाजिरवाना पराभव

IND vs AUS 3rd T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना (IND vs AUS) गुवाहाटी येथे खेळला गेला. मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

याला प्रत्युत्तरात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 222 धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने शेवटच्या विकेटवर ५ विकेट्स शिल्लक असताना विजय मिळवला.

भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 223 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ट्रॅव्हिस हेड आणि अॅरॉन हार्डी डावाची सुरुवात करण्यासाठी फलंदाजीला आले.

दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी झाली. ट्रॅव्हिस हेडने 35 धावांची तर हार्डीने 16 धावांची खेळी खेळली.

मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या जोश इंग्लिशला रवी बिश्नोईने 6 धावांवर बाद केले. मात्र, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांनी ऑस्ट्रेलियन डावाला गती देण्याचे काम केले. दोन्ही खेळाडूंनी मोठे फटके खेळले.

ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा मॅचविनिंग इनिंग खेळून भारताकडून सामना हिरावून घेतला. त्याने 48 चेंडूत 104 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना ५ विकेटने जिंकला.

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 12 चेंडूत 45 धावांची गरज होती. कर्णधार सूर्यकुमार यादवने 19 वे षटक देऊन सर्वात मोठी चूक केली. कारण त्याने खराब गोलंदाजी करत 6 चेंडूत 24 धावा केल्या. सुर्याची ही चूक भारताला नडली.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 6 चेंडूत 21 धावांची गरज होती. सूर्याने 20 वे षटक प्रसिध कृष्णाला दिले. त्याने स्वैर गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकात 21 धावा दिल्या.

28 नोव्हेंबर 2023 रोजी गुवाहाटी येथील आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात शतक झळकावल्यानंतर भारताच्या रुतुराज गायकवाडने आनंद साजरा केला आहे.

या सामन्यात रुतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल भारताच्या डावाची सलामी देण्यासाठी आले होते. मात्र, जयस्वाल 6 धावा करून स्वस्तात बाद झाला. पण दुसऱ्या टोकाकडून गायकवाडने स्फोटक फलंदाजी सुरूच ठेवली.त्याने नाबाद राहून ५७ चेंडूत १२३ धावा केल्या.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे पहिले शतक आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा पार करण्यात यश आले. इशान किशनला खाते उघडता आले नाही.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार सूर्यकुमारने 29 चेंडूंत 39 धावांची मौल्यवान खेळी खेळली. तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या तिलकने २४ चेंडूंत नाबाद ३१ धावांचे योगदान दिले.