नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बुमराहच्या घातक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. यामुळे टीमला चांगली फलंदाजी करता आली. टीमने वर्ल्डकप जिंकल्यांतर आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात जसप्रीत बुमराहच महत्त्वाच योगदान आहे.
त्याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा पुरस्कारही देण्यात आला आहे. असे असताना मात्र बुमराहला त्याच्या गोलंदाजीसाठी जी प्रसिद्धी मिळतेय, ती पाकिस्तानला बघवत नाही. याचे कारण म्हणजे एका पाकिस्तानी पत्रकाराने ICC कडे बुमराहच्या Action ची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे याची चर्चा होत आहे.
यामध्ये आता जसप्रीत बुमराहच्या वेगळ्या Action ची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पाकिस्तानी चॅनल जियो न्यूजचे पत्रकार आरफा फिरोज यांनी केली आहे. यामुळे आता त्याची चौकशी होणार का हे लवकरच समजेल. बुमराहची बॉलिंग Action नियमांमध्ये बसते की, नाही हे आयसीसीने तपासल पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराह त्याच्या वेगळ्या बॉलिंग एक्शनसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केल्यानंतर बुमराह सगळ्यांच्या नजरेत आला. त्याने भारतीय टीममध्ये आपले स्थान बळकट केले आहे. बड्या फलंदाजांना तो घाम फोडतो.
मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने टीमला अनेक मॅचमध्ये विजय मिळवून दिला. बुमराह त्याच्या बॉलिंग Action मुळे इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा ठरतो. बुमराहची गोलंदाजी अधिक घातक बनत चालली आहे. सध्या त्याची गोलंदाजी खेळण कुठल्याही फलंदाजासाठी सोप नाही.
दरम्यान, बुमराहने या टुर्नामेंटमध्ये 8 सामन्यात 15 विकेट काढल्या. फक्त 4.17 च्या इकॉनमीने रन्स दिले. याआधी हा रेकॉर्ड सुनील नरेनच्या नावावर होता. म्हणून प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कारासाठी त्याची निवड झाली. त्याचा हा वर्ल्डकप जिंकण्यामध्ये मोठा वाटा आहे.