रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात रात्री भयानक घटना घडली आहे. या तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. एका आदिवासी पाड्यावर ही दरड कोसळली आहे. यामध्ये २५ ते ३० घरे उद्ध्वस्त झाली आहे.
मातीच्या ढिगाऱ्याखाली १२० लोकं अडकल्याची भिती आहे. मध्यरात्री ही भयानक घटना घडली. त्यानंतर लगेचच याठिकाणी रेस्क्यु ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. या घटनेत आतापर्यंत ६ लोकांचा मृत्यू झालेला असून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.
मातीच्या ढिगाऱ्यांमधून २७ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. त्यामध्ये दोन तीन लहान मुलांचाही समावेश आहे. ४० पेेक्षा जास्त रुग्णवाहिका याठिकाणी दाखल झालेल्या आहे. तसेच गंभीर जखमींना तातडीने रुग्णालात दाखल करण्यात येत आहे.
इर्शाळवाडी ही इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भारात आहे. याठिकाणी आदिवासी लोकांची घरे आहे. मध्यरात्री अचानक दरड कोसळल्यामुळे अनेकजण हे झोपेत होते. त्यामुळे त्यांना तिथून पळताही आले नाही.
अनेक घरे ही या दरडीमध्ये उद्ध्वस्त झाली आहे. सध्या तिथे पाऊस सुरु असल्यामुळे बचावकार्य करण्यातही अनेक अडचणी निर्माण होत आहे. प्रचंड अडथळे येत असल्यामुळे काही काळासाठी बचावकार्य थांबवण्यातही आले होते. पण त्यानंतर ते पुन्हा सुरु करण्यात आले.
या भयानक घटनेमुळे गावातील काही लोक हे जंगलाच्या दिशेने पळाले होते. ते अजूनही परत आलेले नाही. त्यामुळे ते आल्यानंतरच नक्की किती लोक याठिकाणी अडकलेले आहेत हे लक्षात येईल, असे बचावपथकाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले आहे.