नागपूर खंडपीठाने १३ वर्षीय मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खंडपीठाने आरोपीच्या कृत्याला बलात्कार म्हटले नाही. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हा बलात्कार किंवा वासना नव्हती, तर केवळ प्रेमसंबंध होते. आरोपी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक संबंध हे वासनेतून नव्हे तर प्रेम आणि आकर्षणातून निर्माण झाले होते, असेही न्यायमूर्ती म्हणाल्या आहेत. या जामीनावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, आता आरोपीला जामीन देताना न्यायमूर्तींनी केलेल्या या टिप्पणीवरून वाद सुरू झाला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी या बलात्कार प्रकरणाची सुनावणी केली. मुलीने तिच्या जबानीत सांगितलं आहे की, तिने तिच्या इच्छेने घर सोडले होते.
पुढे ती आरोपीबरोबर एकत्र राहिली. दोघांनी त्यांचे प्रेमसंबध मान्य केले आहेत. दोघांमधील प्रेमातूनच शारिरिक संबंध निर्माण झाले. यामुळे ही क्रूरता मानता येणार नाही. केवळ प्रेम आणि आकर्षणातून ते झालं आहे.
दरम्यान, आरोपीने पीडितेवर अत्याचार केले नाहीत, असे मुलीने न्यायालयासमोर सांगितले आहे. मुलीच्या वडिलांनी त्यांची १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. नंतर ती एका २६ वर्षीय तरुणाबरोबर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
नंतर मुलीने पोलिसांना सांगितले की ती या तरुणावर प्रेम करते आणि तिला त्याच्याबरोबरच राहायचे आहे. मात्र मुलीचे वय केवळ १३ वर्षे इतकंच असल्याने पोलिसांनी तरुणाला अटक केली. तेव्हापासून याबाबत सुनावणी सुरू आहे.