काही दिवसांपूर्वी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केलेला. इस्रायलमधील गाझा पट्टीला लागून असलेल्या सीमा भागांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसांचाराचे रौद्ररुप एका व्हिडीओमधून पाहायला मिळाले होते. यामुळे अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला होता.
यामधील एका व्हिडिओमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी एका जर्मन-इस्रायली मुलीला निर्वस्त्र करुन एका ट्रकमध्ये दाबून ठेवले होते. हे दहशतवादी या मुलीचा मृतदेह शहरभर फिरवत होते. असे असताना हे भयानक कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याचा इस्रायल डिफेन्स फोर्सने खात्मा केला आहे.
अमेरिकन पत्रकार रब्बी शुमली यांनी दावा केला आहे की इस्रायलच्या लष्कराने त्या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. हा मृतदेह बघून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला होता.
आईडीएफने जर्मन-इस्रायली महिला शानी लाउकचा मृतदहे गाझाच्या रस्त्यांवरुन फिरवणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. शानी लाउक ही जर्मनीमध्ये राहणारी टॅटू आर्टिस्ट होती. ती इस्रायलमधील नोवा म्यूझिक फेस्टीव्हलसाठी गेली होती.
दहशतवाद्यांनी तिचे हातपाय बांधून गाझाला नेले. तिथे तिच्याबरोबर सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह नग्नावस्थेत फिरवणाऱ्या टोळीतील दहशतवाद्याचा इस्रायलने खात्मा केला आहे.
दरम्यान, शानीच्या देहावरील कपडे काढून तो ट्रकमध्ये टाकून शहरभर फिरवण्यात आला. शानी लाउकच्या मृतदेहावर थुंकत होते. शानी लाउकची चुलत बहीण तोमासिना वेनट्रॉब लाउक हिने व्हायरल व्हिडीओमधील मृतदेहाच्या पायावर असलेल्या टॅटूच्या आधारे शानी लाउकची ओळख पटवली होती.