बुधवारी भारताच्या चांद्रयान ३ चे चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाले आहे. चंद्रावर सुखरुपपणे लँड करणार भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला आहे.
भारताचे चांद्रयान ३ यशस्वी ठरल्यामुळे भारतीय वैज्ञानिकांचे मोठ्या प्रमाणात कौतूक केले जात आहे. तसेच ज्या भागात कोणालाच लँडिंग करता आली नाही, त्या भागात भारताने लँडिंग करुन दाखवल्यामुळे जगभरातून भारतीय वैज्ञानिकांचे कौतूक केले जात आहे.
बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान ३ ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे. भारताने २०१९ मध्येही हा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी त्यांचा प्रयत्न थोडक्यात हुकला होता. त्यामुळे यंदाच्या मिशनसाठीची धाकधुकही वाढली होती.
त्यामुळे या लँडिंगकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागलेले होते. अशात सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडल्यामुळे सर्व भारतीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. विशेष म्हणजे ही लँडिंग पाहण्यासाठी इस्त्रोने लाईव्ह केले होते.
अशात इस्त्रोने केलेल्या लाईव्हनेही सर्व विक्रम मोडून काढले आहे. जगात सर्वाधिक लाईव्ह पाहिलं जाणारं युट्युब चॅनेल म्हणून इस्त्रोने आपल्या नावावर विक्रम केला आहे. ८ मिलियनपेक्षा जास्त लोक हे चॅनेल लाईव्ह पाहत होते.
२०२२ मध्ये ब्राझील विरुद्ध क्रोएशिया सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग झालं होतं. त्यावेळी ६,५ मिलियन लोकांनी ते लाईव्ह स्ट्रिमिंग बघितलं होतं. तोच रेकॉर्ड आता इस्त्रोच्या चॅनेलने मोडला आहे. त्यामुळे इस्त्रोच्या नावावर एकाच दिवसांमध्ये तीन विक्रम झाले आहे.
सर्व भारतीयांना हे लँडिंग पाहता यावं म्हणून इस्त्रोने त्यांच्या चॅनेलवरुन लाईव्ह केलं होतं. त्यावेळी लाखोंच्या संख्येने लोक युट्युब पाहत होते. या चॅनेलच्या सब्सस्क्रायबर्सची संख्या २.६८ मिलियन होती. पण ते लाईव्ह आले तेव्हा २.९ मिलियन लोक त्यांना लाईव्ह पाहू लागले.
१७ व्या मिनिटालाच ही संख्या वाढली आणि आकडा ४ मिलियनच्या पार झाला. त्यानंतर हा आकडा सतत वाढतच होता. ३१ व्या मिनिटाला हा आकडा तर ५.४ मिलियनच्या घरात पोहचला. त्यानंतर हा आकडा थेट ८ मिलियनवर पोहचला होता.