नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहचा सेनापती अफझल खान याला ठार मारण्यासाठी वापरलेले वाघनख परत देण्यास ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सहमती दिली आहे. यामुळे याकडे सर्व शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी लंडनला जाणार आहेत.
यामुळे महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा आपल्यापुढे येणार आहे. असे असताना लोकप्रिय मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी मुनगंटीवार यांना एक सल्ला दिला आहे. मुनगंटीवार हे लवकरच महाराजांची वाघनखं परदेशातून भारतात परत आणणार आहे.
याबाबत नाना पाटेकर म्हणाले की, मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन. जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या पोस्टवर आता सहमती दर्शवली असून अनेकांनी प्रतिक्रियाव्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याबाबत मंत्री मुनगंटीवार म्हणाले, की, सर्व ठरल्याप्रमाणे घडले तर, शिवाजी महाराजांचे वाघनखं काही महिन्यांतच महाराष्ट्रात येईल. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांचे पत्र आम्हाला मिळाले आहे. यामध्ये त्यांनी वाघनखं परत देण्याचे मान्य केले आहे.
शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारले त्या दिवसाच्या दिनानिमित्त आपल्याला ते परत मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले. महाराजांची वाघनखं हा इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. त्याच्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.
ही वाघनखं महाराष्ट्रात येणे हे प्रत्येक मराठी माणसासाठी ऐतिहासिक घटना ठरणार आहे. यामुळे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्ही जगदंबा तलवार यांसारख्या इतर वस्तू देखील परत मिळतील का? हे पाहणार आहोत, असेही ते म्हणाले.