लेकी IAS व्हावी म्हणून आईने नोकरी सोडली, पोरीने IAS झाल्यावर पहील्याच दिवशी आईला…

जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर मेहनत घेतली तर काहीही साध्य करता येते, हे अनेकांनी दाखवून दिले आहे. तसेच मुला-मुलींनी मोठं होऊन चांगली नोकरी मिळावी, असे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते. त्यासाठी ते कष्ट करुन त्यांना शिक्षणही देत असतात.

आई आणि मुलीचं नातंही खुप खास असतं. अशाच एका नात्याची कहाणी आता समोर आली आहे. मुलीसाठी नोकरी सोडणाऱ्या आईला मुलीने मोठं अधिकारी बनून दाखवलं आहे. संबंधित तरुणीचे नाव जागृती अवस्थी असून ती आयएएस अधिकारी आहे.

जागृतीच्या करीअरसाठी तिच्या आईने आपली नोकरी सोडली होती. तिची आई शिक्षिका होती. मधुलता असे त्यांचे नाव आहे. जागृती ही मूळची उत्तर प्रदेशातील असून ती सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. नुकताच तिने तिच्या आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

आपल्या मुलीला नोकरी लागल्यानंतर तिची नोकरीची जागा पाहावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे जागृती यांनी आपल्या आईला मेरठच्या ऑफिसमध्ये नेले होते. त्यावेळी जागृती यांनी आपल्या आईला त्या खुर्चीवर बसवले होते, जिथे त्या बसून कामकाज पाहतात.

जागृती यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपला आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांचे इंस्टाग्राम अकाऊंटवर दीड लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स असून आतापर्यंत ६६ हजार लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. तर अनेकांनी त्यांचे कौतूक केले आहे.

जागृती यांनी भोपाळमधून इंजिनियरिंगची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीत काम केलं होतं. पण त्या कामात मन लागत नसल्यामुळे त्यांनी युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही, पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी ते करुन दाखवलं.