प्रसूती वेदनांमुळे नाही, तर…; इगतपुरीतील गर्भवतीच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती आली समोर

काही दिवसांपूर्वी प्रसूती वेदनांमुळे एका महिलेचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता. आरोग्यसेवेच्या अभावी हा मृत्यू झाल्याचे नागरिकांनी म्हटले होते. तसेच महिलेचा मृतदेह सुद्धा येताना झोळीतून आणावा लागला होता. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.

पावसाळी अधिवेशनातही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. पण त्याप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. इगतपुरीतील त्या महिलेचा मृत्यू स्थानिक वैदूकडून चुकीचे औषधोपचार घेतल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे.

शासकीय रुग्णालयाने याबाबत माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी नीट रस्ता नव्हता. त्यामुळे तिला तशाच रस्त्यांवरुन नेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तसेच मृत्यू झाल्यानंतर झोळीतूनच तिचा मृतदेह आणण्यात आला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. याप्रकरणामुळे आरोग्य प्रशासनावर जोरदार टीका केली जात होती. पण तिचा मृत्यू हा स्थानिक वैदूकडून औषधोपचार घेतल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे.

वैदूकडून घेतलेल्या औषधोपचारामुळे तिला उलट्या होत होत्या. तसेच प्रसूतीपूर्व झटके येत होते. महिलेच्या प्रसूतीची तारीख सप्टेंबर महिन्याची होती. आरोग्य केंद्रावर तिच्या सर्व चाचण्यांचे अहवाल होते, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी म्हटल आहे.

तघोळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वस्तीत ती महिला राहत होती. या परिसरातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी गावकऱ्यांना अडीच किलोमीटरच्या कच्च्या रस्त्यावरुन यावे लागते. पावसामुळे या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात चिखल झाला होता.

२३ वर्षीय वनिता भगतच्या पोटात दुखत असल्यामुळे मध्यरात्री अडीजच्या सुमारास तिला रुग्णालयात न्यावे लागले होते. तिला नेण्यासाठी कुटुंबाला आणि तिच्या नातेवाईकांना याच रस्त्यावरुन पायपीट करावी लागली होती. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना तिलाही प्रचंड त्रास झाला होता. त्यानंतर रुग्णालयात नेल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता.