---Advertisement---

jalgaon news : अभ्यासाचा लोड इतका आहे की मी मरूनच जातो, 10 वी च्या तरुणाने संपवल जीवन…

---Advertisement---

जळगावातील एका दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तन्मय गजेंद्र पाटील (१४, रा. गणेश कॉलनी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत धक्कादायक कारण देखील त्याने लिहून ठेवले आहे.

याबाबत त्याने चिठ्ठीत त्याने म्हटले आहे की, मी मरायला जातो आहे. कारण अभ्यासाचा लोड मला झेपत नाही. मी गेल्यावर तरी शांती होईल. चिडचिड होणार नाही. मला नाशिकला जायचे होते. पण, आता अभ्यासाचा लोड इतका होता की, शेवटी मला मला मरुन जावे लागले.

यामुळे माझा शेवटचा जय गजानन, असे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले होते. गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावात होता. रात्री जेवण करून सर्वजण झोपले होते. वडील गजेंद्र पाटील हे रात्री लघुशंकेला उठले असता त्यांना तन्मय जागेवर दिसला नाही.

त्यामुळे त्यांनी वरच्या खोलीत जावून पाहिले असता मुलाने गळफास छताला गळफास घेतल्याचे दिसले. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. तो ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

तन्मय हा गणेश कॉलनी परिसरात आई, वडील ॲड. गजेंद्र पाटील आणि मोठा भाऊ ओम यांच्यासोबत राहत होता. या घटनेने कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---