Jalgaon News: पत्नी मुलांसह बेपत्ता, पती कौटुंबिक तणावात, शेवटी नको तेच केलं, घटनेने परिसर हळहळला…

Jalgaon News : जळगावमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. शहरातील मेहरूण भागात रेणूका नगर परिसरातील एका इसमाने कौटुंबिक विवंचनेतून गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली. संतोष वामन भावसार (वय ४२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

संतोष हे कौटुंबिक तणावात होते. ते सकाळपासून घराच्या बाहेर पडलेच नाही. याबाबत नागरिकांना संशय आला. त्यांनी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास संतोष भावसार यांच्या घरात जाऊन पाहिले असता ते गळफास घेतलेले आढळले. यामुळे याची माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली.

त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु आहे.

यामुळे कुटूंबाने एकच आक्रोश केला. संतोष भावसार रेणुका नगरात एकटेच राहत होते. त्यांची पत्नी तीन महिन्यांपासून तीन मुलांसहित बेपत्ता आहे. यामुळे ते तणावात होते. प्लम्बिंग काम करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करीत होते.

त्यांच्या विवाहित बहिणी रेणुकानगर परिसरातच राहतात. त्यांना मानसिक त्रास असल्याचे सांगितले जात होते. या घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहेत.