Jay Shah : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव झाला आहे. असे असताना भारताच्या पराभवानंतर चाहते आता बीसीसीआय सचिव जय शाह यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.
सध्या अहमदाबादमधील सामन्याच्या ठिकाणाबाबत सोशल मीडियावर युजर्स जय शाह यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. जय शाहने केवळ कमाईसाठी अहमदाबादमध्ये सामना आयोजित केला होता, कारण त्याला पैसे कमवायचे होते, असा आरोपही केला जात आहे.
दरम्यान, या मैदानावर भारतीय संघाचा विक्रम खराब असताना वर्ल्डकपचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये आयोजित करण्याची काय गरज होती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केवळ पैशासाठी या मैदानावर अंतिम सामना ठेवणे टीम इंडियासाठी अडचणीचे ठरले आहे, असेही अनेकांनी म्हटले आहे. अनेक युजर्स जय शाहवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अंतिम सामना कोलकाता, बंगळुरू किंवा मुंबईत होऊ शकला असता, असे चाहत्यांना वाटते. भारतीय संघाचा बळी फक्त पैसा कमवण्यासाठीच दिला गेला. अशी टीका देखील करण्यात येत आहे.
या प्रकरणावर चाहते सोशल मीडियावर शाह यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. तसेच हा सामना मुंबईत झाला असता तर आपलाच विजय झाला असता. अशी प्रतिक्रिया देखील अनेकांनी व्यक्त केली आहे. यावर अजून कोणत्याही क्रिडा अधिकाऱ्याने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.