प्रसिद्ध मराठीतील अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. गेल्या चार ते पाच दशकापासून ते अभिनय क्षेत्रात काम करत होते.
नाटक, चित्रपटच नाही, तर त्यांनी ओटीटीवरही आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहे, तर काही कलाकार हे त्यांच्यासोबतचे अनुभव शेअर करत आहे.
आता प्रसिद्ध मराठी कलाकार मंगेश देसाई यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांनी जयंत सावरकर यांचे निधन नक्की कसे झाले याचे त्यांनी कारण सांगितले आहे. एका वडापावामुळे त्यांना ऍसिडीटी झाली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे मंगेश देसाई यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत सावरकर यांची प्रकृती खुप चांगली होती. त्यांच्या आरोग्यबाबत कोणती तक्रारही नव्हती. पण त्यांनी त्यादिवशी त्यांच्या खाण्याकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही. त्यामुळे त्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परीणाम झाला.
वयाच्या ८८ व्या वर्षीही जयंत सावरकर हे खुप ऍक्टीव्ह होते. ते नेहमी पथ्य पाळायचे. ते त्यांच्या आहाराकडे अजिबाज दुर्लक्ष करायचे नाही. ते रोज सकाळी मॉर्निंग वॉकलाही जायचे. पण त्यादिवशी त्यांनी नेमका वडापाव खाल्ला. त्यामुळे त्यांना ऍसिडीटी झाली, असे मंगशे देसाई यांनी म्हटले आहे.
ऍसिडीटी झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. अण्णा जातील असं कोणालाही वाटलं नव्हतं. ते आमच्यापेक्षा जास्त त्यांच्या फिटनेसवर लक्ष द्यायचे, असेही मंगशे देसाई यांनी म्हटले आहे.