रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनेकांना तर रस्ते अपघातात आपला जीवही गमवावा लागत आहे. अशीच एक घटना आता मुंबई नाशिक महामार्गावरील खडवली फाट्याजवळ घडली आहे.
या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ६ जण गंभीर जखमी झाले आहे. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की ६ जणांना जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ जणांना स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
ठाणे जिल्ह्यात खडवली फाट्याजवळ एका जीपला एका भरधाव ट्रकने धडक दिली आहे. यावेळी जीप ही रस्ता क्रॉस करत होती. त्यावेळी अचानक ट्रक आल्यामुळे कोणाला हलताही आले नाही. ट्रेलरची ही धडक इतकी भीषण होते की यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या जीपमध्ये काही विद्यार्थीही होते. पडघे इथून रेल्वेने जाण्यासाठी ते जीपमध्ये बसले होते. विद्यार्थ्यांची ट्रेन चुकू नये म्हणून ड्रायव्हर जोरात गाडी चालवत होता. त्यामुळे गाडी वळवत असताना त्याने भरधाव वेगाने येणारा ट्रक बघितलाच नाही.
ड्रायव्हर वळवत असताना भरधाव ट्रकने जोरदार धडक त्यांच्या गाडीला दिली. त्यामुळे त्यांची जीपही काही अंतरावर ट्रकसोबत गेली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये मृत्यू झालेले सर्वच विद्यार्थी होते अशीही माहिती समोर आली आहे.
तसेच या अपघातात जे जखमी झाले होते. त्यांना तातडीने पडघे येथील एका ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असून तेही याप्रकरणी तपास करत आहे. या अपघातामुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.