---Advertisement---

JN.1 Variant : ‘या’ व्यक्तींना कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरीयंटचा धोका सर्वाधिक; तज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

---Advertisement---

JN.1 Variant : सध्या 7 महिन्यांनंतर व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यामुळे चिंता वाढली आहे. सध्या देशात कोरोनाचा नवा JN.1 या सब-व्हेरिएंटचे रूग्ण आढळून येत आहेत. JN.1 मुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवीन लाट येणार आहे हे म्हणण्यापूर्वी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. याला घाबरण्याची गरज नाही, असे काही तज्ञांनी म्हटले आहे. JN.1 पिरोलाचा प्रकार हे BA 2.86 चा वंशज असून ते एक Omicron subvariant आहे. जागतिक आरोग्य संघटनेने JN.1 ला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून वर्गीकृत केले आहे.

नवीन स्ट्रेन वृद्ध लोकांसाठी आणि इतर अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्यांना व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतो. JN.1 हा वेगाने पसरणारा प्रकार आहे. हा सब-व्हेरिएंट त्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतो जे वृद्ध आणि आजारी आहेत.

अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता असते. काही प्रकरणामध्ये गुंतागुंतही वाढू शकते. यामुळे लग्न, ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर असणे चांगला पर्याय असू शकतो. मास्क वापरल्याने कोविडसह इतर समस्याही होण्याचा धोका कमी होतो. 

दरम्यान, देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. काही ठिकाणी या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुमारे 7 महिन्यांपूर्वी कोरोना संदर्भात ‘सार्वजनिक आरोग्य आपात्कालीन’ अधिसूचना मागे घेतली होती.

तेव्हा कोरोना जवळपास संपला असल्याचे दिसत येत होतं. पण आता 7 महिन्यांनंतर व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे आता नेमकं काय होणार हे लवकरच समजेल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---