Junior Mehmood Died: कॉमेडियन ज्युनियर मेहमूद आता या जगात राहिले नाहीत. 1960-70 च्या दशकात बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झालेल्या ज्युनियर मेहमूद यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ते अनेक प्रकारच्या कर्करोगाशी झुंज देत होते.
त्यांचे खरे नाव नईम सय्यद होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंजत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांनी जितेंद्रला भेटण्याची इच्छा त्यांचा बालपणीचा मित्र सचिन पिळगावकर यांच्याकडे व्यक्त केली होती. जितेंद्र त्यांच्यावर उपचार घेत असलेल्या मुंबईतील रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठीही गेले होते.
त्यांच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांना एक चांगला माणूस म्हणून स्मरण करावे ही त्यांची शेवटची इच्छा होती. ते म्हणाले होते की, जर तुमच्या मृत्यूनंतर चार लोक तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवतील तर समजा तुमचे जीवन यशस्वी झाले आहे.
ज्युनियर महमूदचे नाव मनात येताच, प्रत्येकाला त्याच्यावर चित्रित केलेले एक गाणे आठवते – “हम काले हैं तो क्या हुआ, दिलवाले हैं…” शेवटी, दीर्घ आजारानंतर, जूनियर महमूदचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी जगाचा निरोप घेतला.
काही काळापासून सर्वजण त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते, परंतु ते आता कॅन्सरशी लढा देऊ शकत नव्हते. अखेर गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनियर महमूदचा मित्र सलाम काझी याने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
ज्युनियर मेहमूद कॉमेडियन मेहमूदला आपला गुरू मानत. ज्युनियरने अनेक चित्रपटांमध्ये विनोदी बालकलाकार म्हणून काम केले असले तरी, चित्रपटात त्यांनी गायलेल्या हम काले हैं तो क्या हुआ, दिलवाले हैं… या गाण्याने ते प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे विराजमान झाले आहेत.
खरंतर, हे गाणं ज्युनियर मेहमूदने रिक्रिएट केलं होतं आणि ते इतकं हिट झालं होतं की खुद्द राजश्रीलाही त्याच्या टॅलेंटचं वेड लागलं होतं. या गाण्यात ज्युनियर महमूदने महमूदसारखी लुंगी आणि बनियान परिधान केली होती आणि त्याच्यासारखा डान्सही केला होता. तो पडद्यावर आला की प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटत असे.
ज्युनियर महमूद दीर्घकाळापासून पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांना चौथ्या स्टेजचा कॅन्सर होता. त्यांच्या इच्छेनुसार जितेंद्र आणि सचिन पिळगावकर त्यांना टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये भेटायला आले होते.
रुग्णालयात त्यांची अवस्था पाहून दोघांनाही अश्रू अनावर झाले. ब्रह्मचारी, कारवां, हाथी मेरे साथी, बॉम्बे टू गोवा, जोहर मेहमूद इन हाँगकाँग, बचपन इत्यादींचा त्यांच्या संस्मरणीय चित्रपटांत समावेश होता.
त्याचा जवळचा मित्र सलमान काझी त्याच्या मृत्यूच्या बातमीने उद्ध्वस्त झाला. ज्युनियरला 8 डिसेंबर 2023 रोजी म्हणजेच आज दुपारी 12 वाजता जुहू, मुंबई येथे दफन केले जाईल, जिथे त्याच्या आईचे दफन करण्यात आले होते.
काझी यांनी सांगितले की सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांना एक समस्या आली आणि त्यानंतर अचानक त्यांचे वजन कमी होऊ लागले. अहवाल आल्यावर त्यांना फुफ्फुसाचा आणि यकृताचा कर्करोग झाल्याचे आढळून आले. त्याच्या पोटातही गाठ होती. त्याला काविळीचा त्रासही होता. एका विनोदवीराच्या या जगातून जाण्याने प्रेक्षकांना रडवले.