जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंचा धक्का देणारा निर्णय; कार्यकर्त्यांना जोरदार झटका

पुणे : अजित पवार यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. एक शरद पवारांना पाठिंबा देणारा आणि दुसरा अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देणारा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शरद पवार यांच्यासोबत जायचे की अजित पवार यांच्यासोबत जायचे या द्विधा मन:स्थितीत नेते आहेत. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीही हीच परिस्थिती अनुभवली आहे.

त्यामुळेच त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. या राजकारणाला कंटाळून आमदार अतुल बनके यांनी साहेब की दादा याबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रम असतानाच हा निर्णय घेतला. विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. ज्याला जिकडे जायचे आहे त्याने तिकडे जावे. असे त्यांनी सांगीतले

निवडणूक लढवणार नसून सामाजिक कार्यातून जुन्नरचे प्रश्न सोडविण्याचे काम करत राहणार आहे. पाण्याच्या प्रश्नावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अतुल बेनके यांच्या या धक्कादायक निर्णयानंतर कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

मी तटस्थ आहे. विकासकामांसाठी कोणाकडेही जावे लागेल. मी त्यांच्याकडे जाणार असल्याचे अतुल बनके यांनी सांगितले. यापुढेही सामाजिक कार्यात कार्यरत राहणार असल्याची घोषणा जुन्नरचे आमदार अतुल बनके यांनी पत्रकार परिषदेत केली. उर्वरित एक वर्ष मी जुन्नर तालुक्यातील जनतेसाठी काम करणार असल्याचेही ते म्हणाले.

जुन्नर तालुक्याच्या हितासाठी अजित पवारांची गरज आहे. धरणाचे काम ठप्प झाले आहे. सरकार बदलले असून नवीन सरकारने काही बदल केले आहेत. अजित पवारांइतकाच आदर शरद पवारांनाही आहे. आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत. जनतेने आम्हाला विकासकामे करण्यासाठी निवडून दिले आहे. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे.