बॉलिवूड अभिनेत्री काजोल नुकतीच ‘सलाम वेंकी’मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही, पण आई-मुलाचे नाते दाखवणारा चित्रपटाच्या क्लायमॅक्सने लोकांच्या डोळ्यात पाणी आणले होते. त्याचवेळी, आता काजोल तिच्या नवीन प्रोजेक्टसाठी सज्ज झाली आहे.
ती पुढे द गुड वाईफ या हिट शोच्या हिंदी रिमेकमध्ये पाकिस्तानी अभिनेता अली खानसोबत दिसणार आहे. अली खानने अलीकडेच काजोलसोबतच्या त्याच्या किसिंग सीनबद्दल खुलासा केला आणि अभिनेत्री त्याचा बालपणीचा क्रश असल्याचे सांगितले.
पाकिस्तानी अभिनेता अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान काजोलसोबत काम करण्याबाबत बोलत होता. यादरम्यान तो म्हणाला की, काजोल ही एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे जिच्यावर त्याचा क्रश आहे. अभिनेता म्हणाला, ‘मी लहान होतो तेव्हा माझी आवडती अभिनेत्री काजोल होती.
मी गेली जवळपास 3 दशके तिचे काम पाहत आहे आणि मी ऐकले आहे की ती खूप रागीट आहे. आता मालिकेचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर मला त्लाला जाणून घेण्याची संधी मिळाली आहे.
अली खानने सांगितले की, तो या मालिकेत काजोलच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारत आहे, ज्यामध्ये त्याचा एक किसिंग सीनही आहे. या सीनबद्दल बोलताना अली म्हणाला की, हा सीन शूट होत असताना अजय देवगण सेटवर उपस्थित नव्हता. त्याने आणि काजोलने परफेक्ट किसिंग सीन देण्यासाठी तीन ते चार वेळा सराव केला. सीन शुट झाल्यावर काजोल त्याला थॅंक्स डार्लिंग म्हणाली.
या सीरिजमध्ये काजोलचे दोन लिपलॉक सीन आहेत, ज्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की काजोलने हा सीन बंद खोलीत शूट केला होता. अजय देवगण पत्नीला हे सीन शूट करताना पाहू शकत नव्हता. काजोल किसींगचा शुट करतानावेळी ते पाहून अजय सेट सोडून निघून जायचा.
सीन शूट झाल्यानंतर दिग्दर्शक आनंदी झाला आणि काजोलने त्याचे आभार मानले. हे सर्व अतिशय व्यावसायिक पद्धतीने करण्यात आले. अजय देवगणच्या निर्मितीखाली ही मालिका बनवली जात आहे.
तुम्हाला सांगतो की ‘द गुड वाईफ’चा रिमेक गेल्या वर्षी जाहीर झाला होता. मूळ मालिका 2009 ते 2016 पर्यंत चालली होती, ज्यामध्ये जुनियाना मार्गिलेस मुख्य भूमिकेत होते. ‘द गुड वाईफ’चे सात सीझन होते. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अशा परिस्थितीत या मालिकेचा जपानी आणि दक्षिण कोरियन रिमेक बनवण्यात आला आहे. काजोलशिवाय अली खान, शीबा चड्ढा आणि कुब्बरा सैत हे हिंदी व्हर्जनमध्ये दिसणार आहेत.