Kandivali Fire : कांदिवली एका आठ मजली इमारतीला काल भीषण आग लागली. या आगीत माजी आयपीएल क्रिकेटपटू पॉल वल्थाती याची बहीण आणि आठ वर्षांच्या भाच्याचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
येथील साईबाबानगर येथील वीणा संतूर या सोसायटीस सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास आग लागली. या इमारतीत प्रत्येक मजल्यावर चार घरे आहेत. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घरात आग लागली. नंतर ही आग वाढत गेली.
दरम्यान, यावेळी घरात ९० वर्षीय वृद्धा होत्या. त्यांची सून लहान मुलीला शाळेतून घेऊन येत होती. त्या घरात पोहोचताच त्यांनी व्हीलचेअरवरील या आजींना घराबाहेर नेले. यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत. ग्लोरी वल्थाती (वय ४३) आणि जोसू रॉबर्ट (८) अशी मयत मायलेकाची नावं आहेत.
दरम्यान, संपूर्ण इमारतीत धुराचे लोट निर्माण झाले. पहिल्या मजल्यावरील रहिवासी सुखरूप बाहेर पडले, असे असले तरी वरच्या मजल्यावरील रहिवासी अडकून पडले. यामुळे त्यांना बाहेर काढणे अवघड झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामुळे अनेकांचे जीव वाचले. अनेकांना धुरामुळे बाहेर पडणे अवघड होते होते. धुराचा त्यांना त्रास होऊ लागला.
त्यामुळे अनेकजण घराबाहेरील जिन्यातच कोसळले. तासाभराने आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन जवानांनी इमारतीत प्रवेश केला आणि यातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.