Kasara Ghat Accident : क्षणात काळजाचा थरकाप उडाला, कसारा घाटात भीषण अपघात, टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू…

Kasara Ghat Accident : मुंबई- नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटला. यामुळे हा अपघात झाला आहे. हा टेम्पो तिनशे फूट खोल दरीत कोसळला.

या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. आयशर चालक राहुल जाधव वाहक गणेश दुसिंग दोघेही रा. खडकजांब, चांदवड यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर घटनास्थळी लगेच पोलीस दाखल झाले. डुलकी लागल्याने चालक राहुलचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. आयशर वाहन भिंतीचे कठडे तोडून तिनशे फूट खोल दरीत कोसळले.

महामार्ग पोलिस केंद्र घोटी, कसारा पोलिस व आपत्ती व्यवस्थापन टिमच्या सदस्यांना सहा तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, महामार्ग सुरक्षा पोलिस अधिकारी हरी राऊत, रावसाहेब पवार, कर्मचारी मधुकर पवार, दीपक दिंडे, सागर जाधव, कैलास गतीर, कसारा पोलिस पथक आदींनी घटनास्थळी मदतकार्य केले. मदतकार्य खूपवेळ चालली होती.

घाटातील हिवाळा ब्रीजजवळ मध्यरात्री ही घटना घडल्याने मदतकार्याला देखील काहीसा उशीर झाला. सहा तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. नंतर पंचनामा करण्यात आला.