आई नेहमीच आपल्या मुलांना प्रत्येक संकटापासून वाचवण्याचा प्रयत्न करते. ती नेहमी आपल्या मुलांचे रक्षण करते. पण, या नात्याला कलंक लावण्याचे काम एका आईने केले आहे. या आईने प्रियकराच्या साथीने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाची हत्या केली.
मुलाने आपल्या आईला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. आपले अनैतिक संबंध गुपित ठेवण्यासाठी तिने स्वतःच्या मुलाचा जीव घेतला. बिहारमधून ही घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील आहे.
दांडखोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायपूर वॉर्ड क्रमांक 10 मध्ये 12 जुलै रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. तौसीफ असे या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तौसिफची आई रुखसाना आणि तिचा प्रियकर नौशाद यांना अटक केली आहे.
ज्या धारदार चाकूने तौसिफचा गळा चिरून खून करण्यात आला, तोही जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना मुख्यालयाच्या डीएसपी रश्मी यांनी सांगितले की, 13 जुलैच्या घटनेनंतर तौसिफचे वडील मोहम्मद कौम अन्सारीच्या जबाबावरून दोघांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
यानंतर या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना तौसिफची आई रुखसाना हीच खरी गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. अवैध संबंध उघड होतील या भीतीने त्याने तौसीफची हत्या केली. दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला आहे.
तौसीफला त्याची आई आणि तिचा प्रियकर नौशाद यांच्यातील अवैध संबंधांची माहिती होती. याबाबत त्याने वडिलांकडे तक्रारही केली होती. मात्र, त्या रात्री घरी कोणी नसताना नौशाद पुन्हा एकदा तौसीफची आई रुखसाना यांना भेटण्यासाठी घरी पोहोचला.
दरम्यान, तौसिफने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. हे प्रकरण मिटवण्यासाठी नौशादने रुखसानासमोर धारदार शस्त्राने गळा चिरून तौसिफचा खून केला.