विषारी सापांच्या चाव्यामुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा मृत्यू होत असतो. हा आकडा मोठा आहे. सर्पदंशाच्या घटना या पावसाळ्यात सर्वात जास्त होत असतात. याचे कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी शिरते आणि सापाला नाईलाज म्हणून बिळाबाहेर पडावे लागते. यामुळे यावर काही उपास माहिती असणे गरजेचे आहे.
सध्या पावसाळा सुरू आहे. यामुळे साप मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहेत. सापाला पाहून आपला चांगलाच थर काप उडत असतो. भारतात सापाच्या शेकडो प्रजाती आढळतात. या सर्वच प्रजाती विषारी नसतात. मात्र काही विषारी साप हे क्षणात आपला जीव घेऊ शकतात.
अनेकदा पावसामुळे साप घरात किंवा घराशेजारी अडगळीच्या खोलीत शिरतो. जे लोक शेतात घर बांधून राहतात अशा लोकांना घरात साप घुसेल अशी भीती कायम वाटतं असते. यामुळे साप घरात घुसू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी कोणते उपाय केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत.
यामध्ये तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये किंवा खिडक्यांमध्ये कांदा आणि लसणाचे रोप लावू शकता. घरांच्या बागेत कांदा आणि लसणाचे रोप लावल्यास साप घरात घुसण्याची भीती नाहीशी होणार आहे. याचे कारण म्हणजे ही रोपे सापांना आवडत नाहीत. जर तुम्हाला सर्पगंधा सापडले नाही तर तुम्ही निवडुंग, स्नेक प्लांट, तुळशीचे झाड, लेमन ग्रास अशा वनस्पतींची लागवड करू शकता.
या वनस्पतींपासूनही साप लांब राहणे पसंत करतो. पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही ब्लिचिंग पावडरची फवारणी करू शकता. तुम्ही याची घरात किंवा घराशेजारील बागेत, अडगळीच्या खोलीत फवारणी करू शकता. तसेच ब्लिचिंग पावडरच्या पाण्याने तुम्ही घराची फरशी देखील पुसू शकता.
सापांना ब्लिचिंग पावडरचा वास सहन होत नाही. याच्या वासाने साप दूर पळतात. यामुळे हा देखील उपाय तुमच्या फायद्याचा आहे. तसेच किचन मध्ये असणाऱ्या काही पदार्थांचा वापर करूनही सापाला दूर ठेवू शकता. तुम्ही खिडकी आणि दरवाजांना कांदा आणि लसणाची पेस्ट लावू शकता. कांदा आणि लसणाचा तीव्र वास सापांना सहन होत नाही, यामुळे हे फायदेशीर उपाय आहेत.