Crime News : एखाद्या चित्रपटात शोभाव्यात किंवा क्राइम सीरीजचे कथानक असावे, अशा घटना सध्या आपल्या आजूबाजूला घडत आहेत. माणुसकी, विश्वास या भावनांच्या चिंधड्या उडवून नातेसंबंधांच्या नावाखाली निर्घृण कृत्ये घडताना दिसत आहेत. एका 62 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या नातीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
केरळमधील एका कोर्टाने 62 वर्षीय व्यक्तीला दोषी ठरवून 111 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2021 मध्ये घडलेल्या या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि पॉस्को कायद्याच्या विविध कलमांनुसार शिक्षा सुनावली. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आजोबांनी नातीवर केलेल्या अत्याचाराची घटना ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
या प्रकरणी आरोपीला 30 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल, तर उर्वरित शिक्षा एकाच वेळी चालतील आणि कालबाह्य होतील. त्याला 2.10 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आरोपीला पॉस्को कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वात मोठी शिक्षा 30 वर्षांची आहे, त्यामुळे आरोपीला 30 वर्षे तुरुंगात राहावे लागेल.
सरकारी वकील मनोज अरूर यांच्या मते, डिसेंबर 2021 मध्ये ख्रिसमसच्या सुट्टीत नात आपल्या आजोबांकडे आली होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि तिला कुणालाही सांगू नये अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीने या घटनेत बाबत कोणालाही काहीच सांगितले नाही.
घाबरून मुलीने शाळेत गेल्यावर आपल्या मैत्रिणीला घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि पॉस्को कायद्याच्या विविध कलमांनुसार 111 वर्षांची शिक्षा आणि दोन लाख रुपयांचा दंड सुनावला. कोझिकोडमध्ये हे प्रकरण घडलं होतं.
आरोपी नराधम आजोबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.