Kolhapur Murder : एकतर्फी प्रेम अन् २० वर्षीय तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह, कारण ऐकून कोल्हापूर हादरलं…

Kolhapur Murder : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. वाठार येथे एकतर्फी प्रेमातून बळजबरी एका २० वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. यामुळे याचा सध्या तपास सुरू आहे.

याबाबत संशयित आरोपी सनी कांबळे याने एका २० वर्षीय तरुणीशी ओळख करून तिला वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच ९ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास पीडिता घरी जात असताना सनी कांबळेने तिला अडवले. यानंतर त्याने तो तिला जबरदस्ती निर्जण ठिकाणी घेऊन गेला.

यावेळी दोघांत वाद झाला. यामुळे त्यांचे भांडण टोकाला गेले. सनीने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. यानंतर तो पसार झाला. नंतर एक शेतकरी वैरण आणण्यासाठी त्या भागात गेला.

तेव्हा याबाबत माहिती समोर आली. याठिकाणी युवतीचा अर्धनग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी खुनाच्या अनुषंगाने तपास सुरू केला आणि तपासाची चक्रे गतिमान करत संशियत आरोपी सनी कांबळे याला ताब्यात घेतले.

दरम्यान, आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. संशयित हा यापूर्वी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर वडगांव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी संशयित सनी अरुण कांबळे (वय वर्ष २५, राहणार वाठार) यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तपास सुरू आहे. पोलीस बंदोबस्तात मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.