Kolhapur News : रुग्णवाहिकेतून नटून थटून निघाल्या तरुणी, वाटेत अडवताच धक्कादायक प्रकार आला समोर…

Kolhapur News : नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी तरुणींनी भलताच प्रकार अवलंबल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. गरबा खेळण्यासाठी जायला चक्क मुलींनी रुग्णवाहिका वापरली गेली आहे. कोल्हापूरमध्ये ही घटना घडली आहे.

याबाबत तपास सुरू आहे. रुग्णवाहिकेतून जाताना या रुग्णवाहिकेने 2 दुचाकींना धडक देखील दिली आहे. ही रुग्णवाहिका शासकीय रुग्णालयाची होती. कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात ही घटना घडली आहे. अनेकांना वाटले की रुग्णवाहिकेत रुग्ण असेल.

याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींनी गरबा खेळण्यासाठी जायला सीपीआर रुग्णालयाची रुग्णवाहिका वापरली. यामुळे सगळेच अवाक झाले. चक्क सायरन वाजवत रुग्णवाहिका भरधाव निघाली होती.

या रुग्णवाहिकेने एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांना ओव्हरटेक केले व पुढे जाऊन तिने गाडीला धडक दिली. यामुळे ही घटना समोर आली आहे. सुरुवातीला ड्रायव्हरने मागील दरवाजा उघडण्यास नकार दिला. असे असताना मात्र, नागरिकांनी कालवा केल्यानंतर त्याने दरवाजा उघडला.

यामुळे लोकांना धक्काच बसला. याठिकाणी गर्दी करून दाटीवाटीने मुली बसल्या होत्या. त्या तयार होऊन आल्या होत्या. याबाबत पोलिस तपास सुरू आहे. मुलींकडे अधिक चौकशी केली असता गरबा खेळण्यासाठी निघाल्याचे त्यांनी सांगितले