काल एक धक्कादायक प्रकार समोर आला. अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली. कंगना राणावत नुकतीत लोकसभा निवडणुकीत जिंकून आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात तिचा विजय झाला आहे. मात्र काल कंगना काल दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाली असता तिथे एका सीआयएसएफ च्या महिला कर्मचाऱ्याने तिला कानशिलात लगावली. यामुळे याची बातमी वाऱ्यासारखी देशात पसरली. घटनेनंतर कंगना भडकली याबाबत तिने महिला कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली.
नंतर या महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. कुलविंदर कौर असे या महिला जवानाचे नाव असून ती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षापासून ती चंदीगड विमानतळावरती कार्यरत आहे.
असे असताना याबाबत हा प्रकार नेमका का घडला याची देखील चर्चा सुरू झाली आहे. तिने कंगणाला कानशिलात का लगावली? याची बरीच चर्चा सुरू आहे. कंगना राणावतने काही महिन्यांपूर्वी दिल्लीत जे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते, त्यामध्ये या आंदोलनात शंभर रुपये भाड्याने महिला आणल्या होत्या असे वक्तव्य केले होते.
तेव्हापासून पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांमध्ये या वक्तव्याची चीड आहे. त्यावरूनच राग मनात धरून कुलविंदर कौर हिने तिला कानफटात लगावली असे बोलले जात होते, परंतु कुलविंदर कौर हिच्या भावाने मात्र माध्यमांपुढे येत वेगळीच माहिती दिली आहे.
तो म्हणाला, कंगना राणावत विमानतळावर असताना तिची पर्स चेक करताना झालेल्या बाचाबाचीतून हा प्रकार घडला असे सांगितले जात आहे. यामुळे याबाबत आता तपास सुरू आहे. तपासणी सुरू असताना कंगना हिने आपण खासदार आहोत, आता तपासणी करू नये, असे म्हटले.
असे असताना शासकीय सुरक्षेचे कारण सांगत ही तपासणी गरजेचे असल्याचे सांगत कुलविंदर कौर हिने तपासणी सुरू ठेवली आणि यातच बाचाबाची झाली. कंगनाकडून अतिरिक्त शब्द गेल्यानेच हा प्रकार घडला, असा दावा कुलविंदर हिचा भाऊ शेरसिंह मालिवाल यांनी केला आहे.
दरम्यान, कुलविंदर कौर व तिचे पती दोघेही सीआयएसएफ मध्ये आहेत. तब्बल पंधरा वर्षाची तिची नोकरी असून या नोकरीदरम्यान तिची वर्तणूक अत्यंत चांगली आहे. चांगली वर्तणूक असणाऱ्या महिला जवानांमध्ये तिचा समावेश आहे. असून कुलविंदर पंजाब मधील कापूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी आहे. तिच्यावर सध्या कारवाई करण्यात आली आहे.