मैंने प्यार किया हा सलमान खानचा पहिला चित्रपट आहे. हा त्या काळातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटादरम्यान सलमान खान खूपच तरुण दिसत होता. दिग्दर्शक सूरज बडजाता या भूमिकेसाठी सलमान योग्य नसल्याचे मत व्यक्त करत होते, परंतु अखेरीस त्याने आपला विचार बदलला आणि या भूमिकेसाठी सलमान खानची पुष्टी केली.
या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन मुख्य भूमिकेत होती. मराठी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डेही या चित्रपटात होते. या चित्रपटाद्वारे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. याआधी त्याने मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केले होते.
अनेक वर्षांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील एक किस्सा सांगितला होता. शूटिंग सेटवर सलमान खान माझ्याशी बोलत नसल्याचं त्याने म्हटलं होतं. तसेच अनेक गोष्टी सांगितल्या.
लक्ष्मीकांत म्हणाले की, मी मराठी अभिनेता असल्याने आणि त्यावेळी मराठी इंडस्ट्रीत माझे खूप मोठे फॅन फॉलोइंग असल्याने सलमान खान थोडा घाबरला होता. ‘मैं प्यार किया’ चित्रपटादरम्यान कोणीतरी सलमानला लक्ष्मीकांतपासून सावध राहण्यास सांगितले होते. पटकथेत मी ऐनवेळी बदल करतो. असे त्याला कुणीतरी सांगीतले होते.
या सर्व गोष्टींमुळे सलमान खान लक्ष्मीकांतशी बोलत नव्हता. मग लक्ष्मीकांतने स्वतः जाऊन विचारले की तू असे का वागतो आहेस? जोपर्यंत तुमचे माझे ट्यूनींग जमणार नाही तोपर्यंत सीन चांगला होणार नाही. भाग्यश्री लक्ष्मीकांतची खूप मोठी चाहती होती त्यामुळे त्यांची लवकरच मैत्री झाली.
या चित्रपटातील एक प्रसंग सांगताना लक्ष्मीकांत म्हणाले की, जेव्हा आम्हा दोघांना एकत्र एक सीन करायचा होता, तेव्हा मी स्वतः दिग्दर्शकाकडे गेलो आणि दिग्दर्शकाला सांगितले की हा आमचा सीन आहे. मला यातून अव्हॉइड करा नाहीतर सगळी लोकं माझ्याकडे बघत बसतील, या गोष्टीवरून सलमान खानला त्याची चूक कळाली आणि त्याने एकत्र सीन देण्यास सहकार्य केले.
लक्ष्मीकांत यांनी याबाबत एक स्टोरी सांगितली, ‘मराठी इंडस्ट्रीत आम्ही सर्व कलाकार नेहमीच एकत्र असतो.’ लहान भाऊ म्हणून अशोक सराफ यांच्यासोबत मी अनेकदा काम केले आहे, त्यांनी माझी खूप काळजी घेतली आहे.
त्यांनी कधीही आपली ज्येष्ठता दाखवली नाही. म्हणूनच लोक म्हणतात की ही जोडी पाहण्यासारखी आहे. याशिवाय या मुलाखतीत त्याने आणखी एक घटना सांगितली, एकदा त्याने जितेंद्रच्या स्टाईलमध्ये घट्ट पँट घातली होती.
खरं तर त्या घट्ट पँटमुळे मला उभंही राहता येत नव्हतं, बसताही येत नव्हतं. अखेरीस त्याला त्याच्या आईकडून मार खावा लागला कारण त्याची पँट फाटली होती.
लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी संस्कृतीचे विलोभनीय व्यक्तिमत्व होते. कॉमेडीचा बादशाह म्हणूनही त्यांनी अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले. अनेक मजेशीर किस्से सांगून आणि त्यांचे अनुभव सांगून तो आपल्या सहकलाकारांना हसवत असे.