Lalit patil Case : गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यामुळे आता मोठी माहिती समोर येत आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.
ललित पाटील याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात अनेक बडे मासे गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता ललित पाटीलने एक मोठा खुलासा केला आहे. यामध्ये दोन वर्षांपासून पासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचे उत्पादन सुरू होते. दर महिन्याला या ठिकाणाहून ५० किलो एमडीची निर्मिती केली जात होती.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये याचा सप्लाय केला जात होता. ड्रग पेडलर्सच्या मदतीने हा एमडीचा पुरवठा होत होता. हे एक मोठं जाळ त्या दोघांचे होते.
यातून ते दर महिन्याला तब्बल ५० लाख रुपयांचा नफा कमावत होते. तो पोलिसांना मोठ्या प्रमाणावर पैसे देत होता. पोलीस आणि ललित पाटील याच्यासोबत लेमन ट्री हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता. त्यामुळे ललित पाटील याला ससूनमधून कोणी पळवून लावले, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
यामध्ये फक्त ससून रुग्णालय प्रशासनच नव्हे तर काही बड्या राजकीय शक्तींचा हातही असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने राज्यभरात या गुन्ह्याच्या तपासाची जोरदार चर्चा आहे. यामध्ये बडी नावे देखील समोर येण्याची शक्यता आहे.