Lalit patil : आम्ही लक्ष देऊनही असं झालं, तुम्ही तुमच्या पोरांकडे.., पुणे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या आईचे कळकळीचे आवाहन…

Lalit patil : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सुमारे दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन नावाचे म्हणजे MD ड्रग्स होते. यामुळे खळबळ उडाली होती.

हे प्रकरण उघड झाल्यानंतर रुग्णालयातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन ड्रग्स तस्कर ललित पाटील फरार झाला. यामध्ये पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. ललित पाटील हा मूळचा नाशिकचा आहे.

पोलिसांनी ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील यांच्या ड्रग्स बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकत सुमारे ३०० कोटी पेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच कारखाना उध्वस्त केला आहे.

दरम्यान, ललित पाटील याच्याशी गेल्या तीन चार वर्षांपासून आमचे कुठलेही संबंध नसल्याचे त्याच्या आईने सांगितले. त्याचा भाऊ भूषण देखील गेल्या काही महिन्यांपासून आमच्या संपर्कात नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आमची मुलं ड्रग्स प्रकरणात आहेत. अशी माहिती आम्हाला कळली तेव्हा माझ्या पतीला जबर धक्का बसला असून त्यांना सध्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

तसेच त्या म्हणाल्या आम्ही लक्ष देऊन देखील आमची मुलं ड्रग्ज प्रकरणात गेली. इतर पालकांनी आपल्या मुलींकडे लक्ष द्यावं, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. ललित आधी वाईन कंपनीत कामाला होता. नंतर तीन ते चार वर्षे ललित परदेशी शेळी बोकड विक्रीचा व्यवसाय करत होता.