3 भावंडांनी मिळून बनवलं लिंबू सरबत, विषबाधेतून दोघांचा मृत्यू, घटनेने नगर हळहळलं…

अहमदनगर मधील टाकळी काझी गावात एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील तीन मुलांना लिंबू सरबत पिल्याने विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकजण रुग्णालयात दाखल आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मुलांचे वडील बापू म्हस्के हे गवंडी काम करतात. तसेच आई स्वप्नाली बापू म्हस्के या घर काम करतात. दोन्ही मुलं गेल्याने आई-बापावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. शिवराज बापू म्हस्के (वय ४.५ वर्ष) आणि स्वराज बापू म्हस्के (वय १.५ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नाव आहेत.

याबाबत माहिती अशी की, मुलांनी स्वत: लिंबू सरबत बनवलं होत. यामध्ये त्यांनी काय टाकलं होतं हे समजलं नाही. त्यानंतर त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला. लगेचच त्यांना हा त्रास वाढतच गेला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी एका मुलाचा सकाळी तर एका मुलाचा सायंकाळी मृत्यू झाला. यामुळे आईवडिलांना एकच धक्का बसला. तिसऱ्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत सध्या स्थिर आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.

या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी याठिकाणी जाऊन माहिती घेतली. काही वेळातच ही घटना वाऱ्यासारखी पसरली. यानंतर त्यांच्या घरी मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, लहान मुलांनी नेमकं काय बनवलं होत, त्यामध्ये कोणते पदार्थ टाकले होते. याचा तपास केला जात आहे. यामुळे यामध्ये घातपात आहे का.? असा देखील तपास केला जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.