“नितीन देसाईंना मरू दिलं, पण सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव रोखण्यासाठी दिल्लीतून सूत्र हलली”

नुकतेच काही दिवसांपूर्वी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जबाजारी झाल्याचे कारण सांगून आत्महत्या केली. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या कर्जाच्या प्रक्रियेत त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

आता अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांच्या बंगल्याच्या लिलाव होणार असल्याचे समोर आलेले. मात्र काहीच तासात बँक ऑफ बडोदाने हा लिलाव रद्द केल्याची नोटीस बजावली. यामुळे नितीन देसाई प्रकरण समोर आले आहे.

यावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका. त्यांनी दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासोबत काय घडले, याची आठवण करुन देत देओल यांच्या बंगल्याच्या विषयावर टीका केली. तसेच त्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

अभिनेता सनी देओल यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव बँक ऑफ बडोदाकडून केला जाणार होता. ते जवळपास ६० कोटींचे कर्ज फेडू शकले नव्हते, त्यामुळे बँकेने लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीत यंत्रणा हालली आणि २४ तासात तुम्ही लिलाव थांबवला.

त्यांचे घर आणि त्यांनाही वाचवले. मात्र आमचे नितीन देसाई त्यांचा स्टुडिओ वाचवण्यासाठी दारोदार भटकत होते. त्यांनीही कर्ज चुकवायचे होते. त्या घटनेच्या दोन दिवस आधी ते दिल्लीला गेले होते, भाजप नेते आणि मंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही.

देसाईंचा स्टुडिओही वाचवला नाही आणि त्यांचा जीवही वाचवला नाही. मात्र २४ तासात सनी यांचा बंगला वाचवण्यात आला, मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही? असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.