LPG Cylinder Price : व्यावसायिक लोकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नव्या वर्षाआधीच सरकारच्या वतीने 19 किलोग्राम वजनाच्या व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. 39 रुपयांनी हे दर कमी करण्यात आले आहेत.
याचा आता अनेकांना फायदा होणार आहे. यामुळे व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. मुंबईमध्ये सध्या एका सिलेंडरसाठी 1710 रुपये, दिल्लीमध्ये 1757.50 रुपये, कोलकातामध्ये 1869 रुपये आणि चेन्नईमध्ये 1929.50 रुपये मोजले जात आहेत.
असे असताना घरगुती वापरातील सिलेंडरचे दर मात्र स्थिरच आहेत. त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, कमी झालेल्या दरामुळे नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताआधी मिळालेल्या या सवलतीमुळं आता अनेकांनाच याचा फायदा होणार आहे.
याआधी 1 डिसेंबरला इंधन कंपन्यांनी 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या दरात बदल करून 21 रुपयांची वाढ केली होती. त्याआधी देखील हे दर 57 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे यामध्ये बदल होत आहेत. सध्या निवडणुका जवळ येत आहेत. यामुळे बदल होत आहेत.
गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतला असता व्यावसायिक वापरातील गॅसचे दर स्थिर नाहीत. त्यामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत. घरगुती वापरातील सिलेंडरच्या किमती मात्र काही दिवसांपासून स्थिर आहेत. हे दर कमी करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, 30 ऑगस्ट 2023 ला घरगुती सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी करम्यात आले होते. ज्यानंतर मुंबईत त्यासाठी 902.50 रुपये, दिल्लीमध्ये 903 रुपये आणि कोलकात्यामध्ये 929 रुपये इतकी किंमत मोजावी लागत आहे. येणाऱ्या काळात दर अजून कमी होण्याची शक्यता आहे.