Maharashtra Politics : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात देखील भाजपने शिंदे गट आणि अजित पवार गट यांना जवळ करून विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे.
असे असताना महायुतीमध्ये कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता हा जागा वाटपाचा फॉर्मुला समोर आला आहे. यामध्ये अजित पवार गटाला आणि शिंदे गटाला देखील जागा देण्यात आल्या आहेत. राज्यात लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चीत झाले आहे.
राज्यात भाजप, एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी असे 3 गट एकत्र आल्याने जागावाटपात मोठी चढाओढ होणार हे निश्चित मानले जात होते. शिवसेना-भाजप युतीत मागून आलेल्या अजित पवार गटाला किती मिळणार? याबद्दलही चर्चा सुरु होती.
आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. आता भाजप 26, तर शिंदेगट आणि अजित पवार गट 22 जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे याची चर्चा सुरू असून या जागा कुठे आणि कोण लढवणार हे अजून समोर आले नाही.
फडणवीसांनी ही माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. या तिन्ही पक्षांकडून याबद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाऊ शकते. यामुळे याची जोरदार तयारी भाजपने सुरू केली असून मंत्र्यांचे दौरे देखील वाढले आहेत.
दरम्यान, याउलट महाविकास आघाडीचे अजून जागावाटप ठरलं नाही. सध्या लोकसभा निवडणुक काही दिवसांवर आली असून यामुळे पक्ष तयारी करत असून उमेदवार ठरवले जात आहेत. यासाठी इच्छुक देखील प्रयत्न करत आहेत.