सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा वाद पाहायला मिळत आहे. अशात आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी विधानसभेचे अधिवेशन चांगलेच गाजवले आहे. त्यांनी अबु आझमींना सर्वांसमोर सुनावले आहे.
औरंगजाबाचे नाव घेतात म्हणून महेश लांडगे यांनी अबु आझमींवर संताप व्यक्त केला आहे. जर तु छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तर तुझा आणि औरंगजेबाचा संबंध तरी काय? असे म्हणत महेश लांडगे यांनी अबु आझमींना झापले आहे.
महेश लांडगे यावेळी खुपच रागात असल्याचे दिसून आले होते. त्यांचे ते रौद्र रुप पाहून सर्व सभागृहच शांत बसलेले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि हे प्रकरण शांत केले.
२०१२ सालीही असाच एक प्रसंग घडला होता. अबु आझमी हे हिंदीतून शपथ घेत असल्यामुळे मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी त्यांचा माईक हिसकावला होता. त्यामुळे अबु आझमींना पुण्यातील दोन पैलवान भिडले अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
सभागृहामध्ये औरंगजेबावर चर्चा सुरु होती. त्यावेळी महेश लांडगे अचानक उठले आणि त्यांनी अबु आझमींना झापायला सुरुवात केली. जो औरंगजेबाला मानतो त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानण्याचा काय संबंध? सभागृहातील प्रत्येकजण हा शिवाजी महाराजांना मानणारा आहे, असे महेश लांडगे यांनी म्हटले होते.
तसेच जो कोणी मानत नसेल त्याने हात वर करावा. जर शिवाजी महाराजांना मानत असेल तर औरंगजेबाला मानण्याचा काय संबंध? ज्याने आमच्या राजाला, प्रजेला छळलं त्याला मानण्याचा काय संबंध, असे महेश लांडगे यांनी म्हटले आहे.
अशा विकृतींनी आपल्याला थांबवायला हवं. अध्यक्ष महोदय आपण यावर कारवाई करणार का? असा प्रश्नही महेश लांडगे यांनी यावेळी उपस्थित केला होता. महेश लांडगे हे बोलत असताना खुपच संतापलेले दिसत होते. त्यामुळे संपुर्ण सभागृह शांत झाला होता.