माझ्या मुलाने येऊन सांगितलं की तो गे आहे तर…; समलैंगिक संबंधांवर महेश मांजरेकरांचे मोठे वक्तव्य

सध्या समलैंगिक संंबंधांवर जास्त चर्चा होत असते. अनेकजण समलैेंगिक संबंधाला समर्थन देत असतात तर काहीजण विरोध करत असतात. या विषयावर बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट बनले आहे. अनेक कलाकारही या विषयावर बोलत असतात.

आता प्रसिद्ध बॉलिवूड आणि मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. मांजरेकर यांनी एका चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी एक असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे.

महेश मांजरेकर यांची एका काळेचे मणी ही एक वेब सिरिज येत आहे. त्यामध्ये समलैंगिक संबंधावरही भाष्य केलं आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक हे पाहण्यासाठी तयार आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मराठी प्रेक्षकांसोबतच समलैंगिक संबंधांवर भाष्य केलं आहे.

मला वाटतं की आपणच मराठी प्रेक्षकांना कमी लेखतो. आपला प्रेक्षक हा खुप हुशार आहे, तो खुप स्मार्ट आहे. आपल्या आजूबाजूला ज्या कोणत्या गोष्टी घडत असतात त्या सर्व गोष्टी त्यांना माहिती असतात. त्यामुळे जर आपला प्रेक्षक यासाठी तयार नाही, असे म्हटलं तर ते मुर्खपणाचं ठरेल, असे महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे.

तसेच मला वाटते आपल्या प्रेक्षकांना असा कंटेंट पाहायचा आहे. हे खरं असलं तरी आपणच त्यापासून दूर पळतो. पण सध्या सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी लोकांना समजू लागल्या आहे. त्यामुळे लोकं समलैंगिक संबंधांना स्वीकारुही लागले आहे, असे महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे.

सध्या समाज अशा नात्यांना स्वीकारत आहे. आधी एक काळ होता जेव्हा समलैंगिक संबंधाची नाती समजा स्वीकारत नव्हता. पण आता काळ बदलला आहे. माझ्या मुलाने जरी मला आज सांगितलं की तो गे आहे, तर मी ते स्वीकारेन. माझी मुलगी येऊनही मला बोलली की ती लेस्बियन आहे, तरी मी त्यांना स्वीकारेन आणि त्यांना हवं तसं आयुष्य जगू देईन. कारण त्यांना त्यांच्या गोष्टी निवडण्याचा हक्क आहे, असेही महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे