---Advertisement---

पुण्यात भर रस्त्यात जीवघेणा थरार! बाईकवर जाणाऱ्या व्यक्तीवर धाड धाड धाड गोळीबार

---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशात स्वारगेट परिसरात गोळीबाळ झाल्याने संपुर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्वारगेटच्या गणेश क्रीडा मंदिर परीसरात हा गोळीबार झाला आहे.

बुधवारी रात्री पावणे दहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. पिस्तोलमधून तीन राऊंड फायर करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीवर हा गोळीबार झाला ती व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. गोळीबारानंतर स्थानिकांनी तातडीने त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आहे.

सध्या त्या व्यक्तीवर उपचार सुरु आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही तपास सुरु केला आहे. पण हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अजूनही समजू शकलेले नाही. गोळीबार करणाऱ्यांवर लवकरच कारवाई करु, असे पोलिसांनी सांगितले आहे.

क्रीडा मंदिराजवळ एक डायमंड हॉटेल आहे. त्या समोरिल रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. एक व्यक्ती दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी रिक्षातून जात असलेल्या एक व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला आहे. एका व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली होती, त्यानंतर पोलिस लगेचच घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता या सर्व गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांना घटनास्थळावरुन तीन गोळ्या मिळाल्या आहे. तर काही ठिकाणी रक्ताचे डाग आहे. पुण्यातील स्वारगेट भागात ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सध्या पोलिस याप्रकरणी तपास करत असून गोळीबार करणारा व्यक्ती कोण होता? तसेच त्याचा ज्याच्यावर गोळीबार झालेला आहे, त्या व्यक्तीशी काय संबंध होता? या प्रश्नांचा तपास ते करत आहे. त्यामुळे तिथल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही चेक केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---