---Advertisement---

जळगाव पुन्हा हादरलं! १४ वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाने केले अत्याचार, विरोध करताच मोठा दडग उचलला अन्…

---Advertisement---

गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशातच जळगावमधून एक भयानक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर एका व्यक्तीने अत्याचार केले आहे.

संबंधित घटना ही पारोळा तालुक्यात घडली आहे. नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने अत्याचार केले आहे. त्यानंतर तिच्या डोक्यावर दगड मारुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही त्याने केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेत अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव अशोक आहे. त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. तसेच नागरिकांनी तिथे आंदोलनही केले आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला जीवेमारण्याचा प्रयत्न त्या तरुणाने केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

संबंधित मुलगी ही १४ वर्षांची असून ती आपल्या आई आणि भावासोबत पारोळा तालुक्यात राहते. एका शेतीत पत्र्याच्या घरात ती राहते. त्यांची आर्थिक परिस्थिती खुप खराब असल्यामुळे सर्व कुटुंब मजुरीचे काम करते.

अशात नैसर्गिक विधीसाठी ती मुलगी घरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या नदीपात्राजवळ गेली होती. त्यावेळी अशोक तिथे आला. त्याने जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केले. त्यावेळी मुलीने विरोध केला असता त्याने तिच्या डोक्यावर दगड मारला. गंभीर जखमी झाल्यामुळे मुलगी बेशुद्ध झाली होती.

थोड्यावेळाने शुद्धीवर आल्यानंतर ती घरी गेली. घरी गेल्यावर तिने घडलेली घटना सांगितली. जखमी झाल्यामुळे कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तर तिच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही त्या तरुणावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

त्यानंतर ग्रामस्थांनीही पोलिस ठाण्याजवळ जाऊन आंदोलन केले आहे. आरोपीला कठोर शिक्षा द्या नाहीतर त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी ते ग्रामस्थ करत आहे. पोलिसांनीही आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---