पती-पत्नीमध्ये वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण काहीवेळा असे वाद होतात की त्यामध्ये दोघांपैकी एक जण दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला करतो. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे. याठिकाणी एका पतीने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला आहे.
मुंबईतील खार भागात ही घटना घडली असून भररस्त्यात त्याने चाकू भोकसून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पतीने आपल्या ३५ वर्षीय पत्नीवर हल्ला केला आहे.
महिलेच्या गळ्यावर चाकूचे निशाणही आहे. पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे. वैवाहिक वादातून पतीने असे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चाकू भोकसल्यानंतर पती तिथून चालल्या गेला होता. त्यानंतर तातडीने त्या महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर लगेचच उपचार सुरु करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
चाकू भोकसून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस त्या व्यक्तीची चौकशी करुन त्याच्यावर पुढील कारवाई करणार आहे.
दोघांमध्ये वैवाहिक वाद सुरु आहे. न्यायालयातही हे प्रकरण सुरु आहे. रविवारी रात्री ते खार येथे फिरायला आले होते. तिथे त्यांच्यात भांडणं होऊ लागली होती. त्यामुळे संतापलेल्या पतीने तिच्यावर वार करत तिला संपवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.