महिला अत्याचारांच्या अनेक घटना सध्या घडत आहे. असे असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपुर्ण शहर हादरलं आहे. एका चिमुकलीवर एका सुरक्षा रक्षकाने अत्याचार केले आहे.
मंदिरातून घराच्या दिशेने जाणाऱ्या एका ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाले आहे. संबंधित घटना ही वाळूज एमआयडीसी भागात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरजवळच्या वाळूज एमआयडीसी लगतच्या पंढरपूर येथे ही घटना घडली आहे. त्या चिमुकलीचे घर तिथे असलेल्या एका मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. १७ ऑगस्टला ती मंदिरात हरिपाठासाठी गेली होती.
त्यावेळी तिची बहिण सुद्धा तिच्यासोबत होती. ती मंदिरात गोंधळ घालत असल्यामुळे तिच्या बहिणीने तिला घरी पाठवले. ती घरी जात असताना आरोपीही कंपनीतून घरी जात होता. त्यावेळी त्याने अंधाराचा फायदा घेत तिचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केले.
चिमुकली त्यानंतर घरी आली. पण तिला खुप वेदना होत होत्या. तिच्या कुटुंबियांनी याबाबत विचारले असता तिने घडलेला सर्वप्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी वाळूज पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत लगेचच एक तपास पथक स्थापन केले. पोलिस निरीक्षक अविनाश जाधव यांनी संपुर्ण परिसरात त्याचा शोध घेतला. मुलीने सांगितलेल्या वर्णनावरुन पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे.