मनोज जरांगे यांचा पहिला उमेदवार ठरला? इच्छुकांच्या मुलाखती, राजकीय घडामोडींना वेग…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः देखील याला दुजोरा दिला आहे. असे असताना त्यांचे उमेदवार देखील ठरवले जात असल्याची माहिती आहे.
भाजपचे माजी खासदार भास्कर खतगावकर यांच्या सून मिनल खतगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

विधानसभा निवडणूक मतदारसंघातून पाठिंबा देण्यची मागणी केली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. मिनल खतगावकर भाजपच्या माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सून आहेत. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मिनल खतगावकर नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिल्या आहेत. २०१९ मध्ये विधानसभेला तसेच या लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या. दोन्ही वेळेला त्यांना पक्षाच्या आदेशानंतर माघार घ्यावी लागली. यामुळे त्या नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांची देखील भेट घेतली होती. २९ तारखेला त्या निर्णय घोषित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या मनोज जरांगे पाटील इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार द्यायचे असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता त्यांचा नंबर लागणार का? हे लवकरच समजेल.

दरम्यान, धुळे सोलापूर महामार्गावर पैठण फाटा या ठिकाणी जरांगेंचे संपर्क कार्यालय सुरू होतं आहे. याठिकाणी रणनिती ठरवली जाणार आहे. यामुळे यामध्ये नेमकं काय ठरणार हे देखील लवकरच समजेल. सध्या जरांगे पाटील राज्यात दौरे करत आहेत.

सध्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून मनोज जरांगे हे आक्रमक झाले आहेत. ओबोसीमधून जर आरक्षण मिळाले नाही तर सर्व जागा लढवू, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता सरकार नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.