मराठी महिलेला घर नाकारले, फेसबुकवर व्यथा मांडली; मनसेने हिसकाच दाखवताच घडलं असं की..

मुंबईत अनेकदा मराठी माणसावर अन्याय झाल्याच्या बातम्या आपण बघितल्या आहेत. अनेकदा मराठी माणसाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश नाकारल्याच्या घटना घडत असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याबाबत माहिती अशी मी, महिलेने आणि तिच्या पतीने मुलुंड पश्चिमेला एका इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा पहिली होती. असे असताना आता आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही असे या सोसायटीमार्फत सांगण्यात आले. तसेच महिलेला बाहेर काढले.

महिलेने तुम्ही जे सांगत आहात ते लेखी द्या, असे सांगितले. नंतर सोसायटीच्या सचिवांनी अरेरावाची भाषा सुरू केली. तसेच हुज्जतही घातली. तिला बाहेर काढले आणि नवऱ्याला देखील मारहाण केली. यामुळे महिला संतापली.

राग अनावर झाल्यानंतर महिलेने फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड करुन याबाबत माहिती दिली. नंतर मुलुंड मनसेचे उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांनी त्याठिकाणी भेट दिली. तसेच या घटनेची माहिती घेतली. यावेळी मनसेचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

यावेळी सोसायटीच्या सेक्रेटरीला मनसेने जाब विचारला. सोसायटीकडून बोललेल्या व्यक्तीला सगळ्यांनी जाब विचारत चांगलेच खडसावले. यानंतर त्या व्यक्तीने माफी मागितली. यामुळे प्रकरण शांत झाले. मनसेने अशा प्रकारे अनेकदा अनेक कार्यालयात जाऊन राडा केला आहे.