---Advertisement---

मराठमोळ्या स्टारचा धक्कादायक खुलासा, म्हणाली तेव्हा मला मला नग्न केले अन्…., मुलाखतीतून केला गौप्यस्फोट

---Advertisement---

लोकप्रिय मराठी सोशल मीडिया स्टार मृणाल दिवेकर सध्या चर्चेत आली आहे. मुलाखतीत तिने लहान असताना तिच्याबरोबर घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला. यामुळे खळबळ उडाली आहे. ती म्हणाली, एका ट्युशन टिचरने आपल्याला नग्न केले होते.

एकदा माझ्या एका ट्युशन टिचरने होमवर्क केला नव्हता म्हणून मला नग्न केले. त्यावेळी मी चौथीत होते, माझं वय ९-१० वर्षे असेल. मी दोन-तीनवेळा होमवर्क केला नव्हता म्हणून असे केले होते. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

ती कराडच्या एका शाळेत आधी शिकायची. नंतर इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. त्यामुळे दोन्ही शाळेतला फरक मला कळला. कराडमध्ये मला खूप तुच्छतेने वागवायचे. तिथले शिक्षक मारायचे, वाचता आले नाही, गणित सोडवता आलं नाही तर ते खूप अपमान करायचे, असेही तिने म्हटले आहे.

पुढे ती म्हणाली, लहान मुलांना मारणं, त्यांचे कपडे काढणं, तोंडावर चिकटपट्टी लावणं या गोष्टींचे नंतर खूप आघात होतात. त्याचा पुढे आयुष्यावर परिणाम होत असतो. तणाव येतो, स्वतःवर शंका येते की मी चांगली आहे की नाही.यामुळे हे चुकीचं आहे.

मी हे चांगलं करतेय की नाही, लोक जज करतील का, असे विचार मनात येतात. शिक्षकांना याचे परिणाम माहीत नसतात, पण मुलांच्या मनावर या गोष्टींचे आघात बराच काळ राहतात, असेही तिने म्हटले आहे.

दरम्यान, तिथून ती इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. तिथे जी मुलं नाटक किंवा खेळात चांगली होती, त्यांचे एक वेगळे सेक्शन बनवले होते. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला जे जमतं ते करा, असे सांगितलं जातं होत, यामुळे ते फायदेशीर होत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---