पुण्यात मध्यरात्री थरार! आमदाराच्या पुतण्याने थेट राँग साईडने कार पळवली, दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू….

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एका कारने दुचाकीला उडवल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका कारचालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसरा गंभीर जखमी झाला आहे. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गाडी चालक हा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कारवाईची मागणी केली जात आहे. एकालहरे गावाजवळ ही घटना रात्री उशिरा घडली आहे. मयूर साहेबराव मोहिते असे चारचाकी चालकाचे नाव आहे. तो खेड तालुक्यातील मोहितेवाडी, शेल पिंपळगाव येथे राहणारा आहे.

याबाबत मंचर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकालहरे गावाजवळ ओम भालेराव हा मंचरहून कळंबच्या दिशेने गाडीने येत होता. त्यावेळी कळंब बाजूकडून मंचरकडे येणारी फॉरच्यूनर गाडी क्रमांक एम.एच.१४ के.जे. ७५५७ वरील चालकाने भरधाव वेगाने रोडच्या विरूद्ध बाजूने चालवून मोटार सायकलला जोरात धडक दिल्याने अपघात झाला.

यामध्ये ओम भालेराव याचा मंचर येथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून संगण्यात आले. अपघातनंतर मयूर हा घटनास्थळी न थांबता निघून गेला. त्यामुळे नितीन भालेराव यांनी मंचर पोलीस स्टेशनमध्ये मयूर मोहिते विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, पुणे कार अपघात प्रकरण राज्यात गाजत आहे. बड्या व्यक्तीला वाचवण्यासाठी सर्वांनी कसे प्रयत्न केले हा प्रकार ताजा असताना आता आमदार मोहिते पाटील यांच्या पुतण्याने चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्याने हा अपघात झाला, यामध्ये एकाचा जीव गेला. अधिक तपास मंचर पोलीस करत आहेत

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र वाढले आहे. यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. याबाबत कठोर कारवाई करण्यात आली तर असे प्रकार कमी होतील अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.