Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. मनोज जरांडे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण देखील धरले होते. अखेर मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी काही वक्तव्य केली होती. त्यानंतर भुजबळ यांना कडाडून विरोध होत आहे.
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ ठाम आहेत. यादरम्यान भुजबळ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी चर्चा रंगली आहे. तसेच शिवसेनेच्या काही नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे भुजबळ यांचे मंत्रीपद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. यामुळे चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे.
सध्या शिवसेनेच्या दोन आमदारांनी भुजबळ यांची मंत्रीमंडळातून हक्क पट्टी करण्याची मागणी केली आहे. तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून कमरेत लाथ घालून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर भुजबळ प्रतिक्रिया देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तसेच पुढे बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही. गायकवाड यांनी हे आव्हान थेट भुजबळ यांनी्आ दिले आहे. ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. मराठा आरक्षणावरून अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनी सरकारच्या विरोधातच आघाडी उघडली आहे.
सरकारने मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याबाबत तयार केलेल्या नव्या मसुद्यावर भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. भुजबळांच्या मते, या मसुद्यामुळे आरक्षणात नवे वाटेकरी तयार होतील. भुजबळांचे हे वक्तव्य राष्ट्रवादीत खळबळ उडवून देणारे ठरले आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरेंनी मराठा आरक्षणाचं समर्थन केले आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नावरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. हे मतभेद वाढत गेल्यास ते राज्याच्या राजकारणावर परिणाम करू शकतात.भुजबळ यांच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा प्रश्न कसा सोडवला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.