लहानपणी आई वारली, वडील खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात, मात्र पोरगा MPSC मध्ये राज्यात पहीला

विष्णू कांबळे या तरुणाने एमपीएससी परीक्षेत आपल्या नावाचा झेंडा रोवला आहे. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे. त्याने खुल्या प्रवर्गातून ४१ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तर अनुसूचित जाती प्रवर्गातून तो प्रथम आला. मात्र त्याचा हा प्रवास अतिशय खडतर होता.

याबाबत माहिती अशी की, विष्णू अवघा ४ वर्षाचा असताना त्यांच्या आईचे निधन झाले. तसेच खुनाच्या आरोपाखाली वडील कारागृहात शिक्षा भोगत होते. यामुळे त्याची परिस्थिती बिकट असताना देखील त्याने हे यश संपादन केले आहे. विष्णू कांबळे आजोळी राहून त्याने शिक्षण पूर्ण केले.

दरम्यान, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे समाज कल्याण वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले. २०१६ साली पॉलिटेक्निक परीक्षा शेवटच्या सत्रात ८९ टक्के घेऊन उत्तीर्ण झाला.

त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून निवडला गेला. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

विष्णू हा मदनसुरी ता. निलंगा येथील आहे. आईचे निधन आणि वडील तुरुंगात असल्याने तेव्हापासून त्यांचा सांभाळ मामा आणि आजी यांनी आजोळी केला. शिक्षणासाठी तो पाहुण्यांच्यात राहिला. तसेच वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले.

दरम्यान, विष्णूची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंतापदी निवड झाली आहे. यामुळे आता त्यांचे दिवस बदलणार आहेत. यामागे त्याचे कष्ट आणि जिद्द आहे. सध्या सर्व स्थरातून त्याचे कौतुक केले जात आहे.