आई आणि लेकीचं नातं हे खुप खास नातं मानलं जातं. पण काहीवेळा या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एक घटना आता छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. एका आईने आपल्या मुलीला चक्क जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फक्त पैशांसाठी त्या आईने आपल्या मुलीसोबत असे भयानक कृत्य केले आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आता त्या मुलीने तिच्या आईविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे.
मुलीने केलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी मुलीला पहाटे अचानक जाग आली. त्यावेळी तिने बघितले की तिची गोधडी जळत होती. त्यामुळे ती स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ती तिथून लांब गेली. त्यावेळी तिची आई सुद्धा तिथेच होती. पण तिने काहीही मदत केली नाही.
तसेच भाऊने हे बघितल्यानंतर तो तिच्या मदतीला धावून आला. त्याने त्याच्याजवळ असलेली एक गोधडी तिच्या अंगावर टाकून ती आग विझवली. या घटनेमुळे मुलगी खुपच घाबरली होती. पण तरीही तिच्या आईने काहीही केले नाही.
तिच्या आईनेच हे सर्व केल्याचे तिच्या समोर आले. तिची आई एका तांत्रिकाला भेटली होती. त्यानंतर तिची आई त्या तांत्रिकाच्या सांगण्यावर काम करत होती. शकुंतला आहिरनेच मुलीसोबत असे कृत्य करण्याचे तिच्या आईला सांगितले होते.
त्यामुळे आईने कुठलाही विचार न करता मुलीला जाळण्याचा प्रयत्न होता. आता मुलीने तिची आई पार्वती हलमुख आणि तांत्रिक शकुंतला आहिर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी याप्रकरणी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही.