सिनेमात काम देतो म्हणत दिग्दर्शकाची तरुणीवर जबरदस्ती, नकार देताच केले ‘हे’ भयंकर कृत्य; मुंबईतील घटना

फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकांना खुप ग्लॅमर दिसतं. पण ग्लॅमर मागे खुप वाईट गोष्टीही असतात. त्या गोष्टींचा अनेकदा कलाकार खुलासा करताना दिसत असतात. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचच्या अनेक धक्कादायक घटनाही घडत असतात.

अनेकदा अभिनेत्री आपल्यासोबत घडलेल्या घटनांबद्दल सांगत असतात. मुंबईतून अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका कास्टिंग डायरक्टरने एका १८ वर्षाच्या तरुणीसोबत एक वाईट कृत्य केलं आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख बनवण्यासाठी ती तरुणी मुंबईत आली होती. पण एका डायरेक्टरने तिला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर तिच्यासोबत चुकीची गैरवर्तवणूक केली आहे. तसेच तिने नकार दिल्यामुळे त्याने तिचं डोकंही फोडलं आहे.

दीपक मालाकर असे त्या कास्टिंग डायरेक्टरचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तो २६ वर्षांचा असून गेल्याकाही वर्षांपासून तो मुंबईतच राहत आहे. दीपकची फेसबुकवरुन त्या मुलीशी ओळख झाली होती.

त्यानंतर त्याने तिला मुंबईत बोलावून घेतलं. दोघेही एका फ्लॅटमध्ये राहत होते. अशात दीपकने तिला मित्राच्या पार्टीमध्ये नेले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने नकार दिला तेव्हा त्याने तिचं डोकं भिंतीला आपटलं.

या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली. दीपकला वाटलं की मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याने मुंबईतून पळ काढला. पण शुद्धीवर आल्यानंतर त्या तरुणीने पोलिस ठाण्यात जाऊन दीपक विरोधात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत दीपकचा तपास सुरु केला. तो मुंबईत नसल्यामुळे त्याला शोधणे कठीण जात होते. पण पोलिसांनी त्याच्या मित्रांची चौकशी केली. तो मित्रांच्या सतत संपर्कात असल्यामुळे पोलिसांना त्याचं लोकेशन कळलं. त्यानंतर आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.