Mumbai news : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. याठिकाणी एका महिला डॉक्टवर बलात्कार झाल्याची ही घटना आहे. याबाबत महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे. याबाबत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, आरोपीने या महिलेला बेशुध्द पडल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच बलात्कार करून तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे ही महिला घाबरली होती. तिला आरोपीने ब्लॅकमेल करून पैसे देखील घेतले आहेत.
ही महिला विवाहित असून काही घरगुती कारणांमुळे पतीसोबत राहत नाही. ती एकटीच राहते. या व्यक्तीने पीडित महिला आणि पती यांच्यामधील वाद मिटवून देतो, असे सांगितले. तिचा विश्वास संपादन केला.
नंतर आरोपीने पिडित महिलेला क्लबमध्ये बोलावले. क्लबमध्ये गेल्यानंतर आरोपीने पीडित महिलेला जबरदस्तीने वाईन पाजली. त्या वाईनमध्ये आरोपीने काहीतरी मिसळले होते. त्यामुळे ती महिला बेशुध्द झाली. यामुळे तिला आपल्यासोबत काय होतंय याबाबत समजले नाही.
त्याने त्या पीडितेला कारमधून घरी नेलं. आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे व्हिडीओ आणि फोटो काढले आणि त्यानंतर त्या महिलेला वारंवार ब्लॅकमेल करू लागला. आरोपी आणि पीडित महिलेची ओळख एका क्लबमध्ये बॅडमिंटन खेळताना झाली. मात्र तिच्यासोबत धक्कादायक घटना घडली.
दिवसेंदिवस आरोपीचे कृत्य वाढत असल्याने पीडित महिलेने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेतली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.